Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आंदोलन बंदीच्या आदेशाचे उल्लंघन; माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह १२५ कार्यकर्त्यांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आंदोलन निदर्शनास बंदीचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश असतानाही सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार्‍या भाजपचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे यांच्यासह १२५ कार्यकर्त्यांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्रिपुरा राज्यात घडलेल्या घटनेच्या पाश्वभूमीवर मालेगाव, नांदेड, अमरावती येथे जे पडसाद उमटले या प्रकाराची चौकशी  सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी या मागणीसाठी सोमवारी भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने तसेच ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी भाजपच्या पदाधिकार्‍यांना परवानगी नाकारलेली असताना तसेच जिल्हाधिकारी यांचे जिल्ह्यात आंदोलन निदर्शने या बंदीचे आदेश असतानाही त्या आदेशाचे उल्लंघन केले तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले.

 

त्यामुळे याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे राकेश दुसाने यांच्या फिर्यादीवरून  भाजपचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण , माजी विधानपरिषद आमदार स्मिता पाटील,  महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी , जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे , अशोक कांडेलकर  , प्रकाश भगवानदास पंडित या पदाधिकार्‍यांसह १२५ कार्यकर्त्याविरुध्द जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहेत

 

Exit mobile version