Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आंदोलक शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी युवराज वाढदिवस साजरा करणार नाही

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह याचा आज ३९ वा वाढदिवस आहे. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचं युवराजनं ट्विट करत सांगितलं आहे.

शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या लवकर पूर्ण व्हाव्यात अशी इच्छाही त्यानं व्यक्त केली आहे. शिवाय वडील योगराज सिंह यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

युवराज म्हणतोय की, ‘शेतकरी हे आपल्या देशाची लाईफलाइन आहेत. अशी कोणतीही समस्या नसते की ज्यातून मार्ग निघत नाही. चर्चेच्या माध्यमातून प्रत्येक मुद्दा सोडवता येऊ शकतो. आजचा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्यात सुरु असलेल्या चर्चेतून मार्ग निघावा अशी माझी इच्छा आहे.’

वडिलांनी केलेले वक्तव्यही निराशजनक असल्याची प्रतिक्रिया युवराजनं दिली आहे. भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. योगराज सिंह यांच्या वक्तव्याशी माझा कोणताही संबंध नाही. त्याच्याशी मी सहमत नाही.

“हे हिंदू गद्दार आहेत. शंभर वर्षांपासून मुघलांची गुलामी केली,” असं वादग्रस्त वक्तव्य योगराज सिंग यांनी एका भाषणात केलं होतं. त्याचं हे भाषण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे

Exit mobile version