Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त निष्कलंक धाम येथे योगाभ्यासाचे आयोजन

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  २१ जून २०२३ रोजी नववा आंतरराष्ट्रीय योग दिन असल्याने भारतातच नव्हे तर जगभर योग दिन साजरा करून प्रत्येक जण योगा करणार आहे. यानिमित्ताने आपल्या परिसरात परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी निर्माण केलेल्या वढोदे (फैजपूर) येथील निष्कलंकधाम तुलसी आरोग्य सेवा केंद्र येथे विनामूल्य २१ जून बुधवार रोजी सकाळी सहा ते आठ या दरम्यान योगाभ्यास विषयी मार्गदर्शन तथा सर्वांसाठी योग प्रात्यक्षिक संपन्न होणार आहे.

 

या कार्यक्रमाला निसर्गोपचार तज्ञ म्हणून आचार्य सचिन जी हे शास्त्रशुद्ध पद्धतीने योगाचे धडे देणार आहे. यावेळी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे मार्गदर्शन व सहवास सर्वांना लाभणार आहे. येथे येताना योग चटई किंवा रग तसेच एक रुमाल सोबत आणावा.  आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त संख्येने आपल्या कुटुंबासह सर्वांनी घ्यावा असे आवाहन श्री सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेने केले आहे. उपस्थित सर्वांना सात्विक नाश्ता व आयुर्वेदिक काढा देण्यात येणार आहे.

 

स्त्री – पुरुष तथा विद्यार्थी – विद्यार्थिनी साठी नाव नोंदणी विनामूल्य असून दिं. २० जून २०२३ संध्याकाळ पर्यंत राजेंद्र मोरे (बाळू काका) ७९९९७१७६३५, आचार्य सचिनजी ९९२६१७५८५०, प्रा. उमाकांत पाटील ९४२१७५२३२२/९८२३०४७१३५, अशोक नारखेडे ९५७९८८६७७६ यांचेशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Exit mobile version