Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आंतरराष्ट्रीय मानव अधिकार परिषदेच्या राज्य युवा विभाग अध्यक्षपदी सुरज नारखेडे यांची निवड (व्हिडिओ)

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मानवता हा धर्म जोपासत नेहमी मानवी हक्कासाठी लढा देण्यात येईल व मानव घटकाला न्याय देण्यासाठी राज्यातील सर्व क्षेत्रात शासकीय, निमशासकीय आदी प्रत्येक ठिकाणी मानवाधिकार परिषद अध्यक्ष या नात्याने न्याय देण्याचा प्रयत्न करेल अशी  सुरज नारखेडे यांची ग्वाही दिली.

 

सुरज नारखेडे यांची आंतरराष्ट्रीय मानवअधिकार परिषदेचे राज्याचे युवा विभाग अध्यक्षपदी निवडी जाहीर झाल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.  डॉ. सनी लक्ष्मीचंद शहा यांच्या सूचनेनुसार या परिषदेच्या राष्ट्रीय बोर्ड कार्यकारणी कमिटीने सर्वानुमते ठराव करून सुरज नारखेडे यांची निवड घोषित केली. कार्यकारणी बोर्डने हा ठराव तर पारित केला तसेच सुरज नारखेडे यांचा येणाऱ्या जुलै महिन्यातील कार्यकारणी बोर्ड कमीटीमध्ये सर्वानुमते अभिनंदनाचा ठराव सुद्धा करण्यात आला.

सुरज नारखेडे यांचा कार्याचा अहवाल आणि त्यांची समाजिक विविध क्षेत्रातील कामगिरी पाहून प्रशासनावरील असलेली पकड व प्रत्येक क्षेत्रातील प्रशासनाचा असलेला सखोल अभ्यास या बाबींचा आढावा घेऊन करण्यात आला. या निवडीला सुमारे ६ महिन्याचा कालावधी घेऊन या निवडीबद्दल राष्ट्रीय बोर्ड कमिटीने सर्वानुमते ठराव करून निर्णय घेतला. निवडीनंतर नारखेडे यांना राष्ट्रीय बोर्ड कमेटीने दूरध्वनीव्दारे शुभेच्छा दिल्या. ईमेलव्दारे त्यांना निवडीबद्दलचे अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले. येत्या जुलै महिन्यात असलेल्या राष्ट्रीय बोर्ड कमिटीच्या परिषदेस सुरज नारखेडे यांना आमंत्रित करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला ललित नारखेडे, हितेश नारखेडे हे उपस्थित होते.

 

Exit mobile version