Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलविण्याच्या निर्णयावर महाविकास आघाडीची टीका

मुंबई (वृत्तसंस्था) संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन साजरा होत असतांना दुसरीकडे केंद्र सरकारने मुंबईत होणारे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) हे गुजरातला हलवण्याचा घेतला होता. केंद्रातील मोदी सरकारने घेतलेला निर्णयाविरोधात राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेसने सडकून टीका केली आहे.

 

 

केंद्र सरकारच्या निर्णयावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केवळ नाव दिल्याने कुठलेही शहर आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र होत नसते. IFSC हे नाव घेतले म्हणून गांधीनगरला ते वित्तीय सामर्थ्य मिळणार नाही. जागतिक आर्थिक केंद्र मुंबईची ताकद राहीलच, ती शक्ती फक्त मुंबईतच आहे हे जग जाणते ,अशी टीका केली आहे. तर देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईचे विशेष महत्व आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे. राज्याचा आर्थिक कणा मोडण्याचा प्रकार आहे. आजही मुंबई महाराष्ट्राला आणि देशाला पोसते. एवढा व्यवहार मुंबईतून होतो. त्यामुळे महाराष्ट्र दिनीच हा प्रकार करणे हे दुर्दैवाचे आहे, अशी टीका अन्नपुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. तर काँग्रेसचे युवक नेते सत्यजित तांबे यांनी IFSC चे मुख्यालय गुजरातला जात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत असताना IFSC मुंबईत BKC येथे असेल असे आश्वासन दिले होते. पण आता, भाजप शांत का?, असा थेट सवाल उपस्थित केलाय.

Exit mobile version