Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आंतरराज्य सीमेला अधिकाऱ्यांची भेट

रावेर, प्रतिनिधी । महाराष्ट्रा-मध्य प्रदेश सिमेवरील शेरी नाक्याची आज प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसिलदार उषाराणी देवगणे यांनी कोरोना वायरसच्या पार्श्वभूमीवर या अंतरराज्य सिमेला भेट देऊन पाहणी केली.

याबाबत वृत्त असे की, प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी आज सकाळी खिर्डी येथे भेट देऊन गावांतील नागरिकांनी जमा केलेले किट्स गरजु कुटुंबाना दिले. त्यानंतर त्यांनी खिरोदा येथे जाऊन रेशनकार्ड संदर्भातील तक्रार सोडवली व त्यानंतर मध्य प्रदेश महाराष्ट्रा सिमेवरील शेरी नाक्याची त्यांनी पाहणी करून आवश्यक त्या सूचना येथे असलेल्या पोलिस, शिक्षक व आरोग्य प्रशासनाला देण्यात आले आहे. यावेळी त्यांच्या सोबत रावेर पालिकेचे सीईओ रविंद्र लांडे देखिल उपस्थित होते.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झालेली आहे. कोवीड केअर सेंटर व कोविड हेल्थ युनिट उभारण्याच्या कार्यवाहीसह शहरातील प्रत्येक कुटुंबाचे आरोग्य विभागाच्या ९ पथकांकडून सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. कोरोनाच्या सावटाखाली संपूर्ण जग असतांना तालुक्यातील आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली आहे. बाहेरून आलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष देण्यात येत असून संपूर्ण शहराचे कोरोनाच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. डी. महाजन यांनी ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, राष्ट्रे बाळ स्वास्थ कार्यक्रमाचे आरोग्यसेविका, फार्मासिस्ट यांची बुधवारी बैठक घेऊन सर्वेक्षणाबाबत सूचना दिल्या. शहरातील सर्व भागातील रहिवाशांचे प्रत्येकाच्या घरी जाऊन आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी १९ कर्मचाऱ्यांची ९ पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत.

Exit mobile version