अॅमेझॉन : मोबाइलच्या डब्यात रिन साबण पाठवला

नवी दिल्लीः वृत्तसंस्था । दिल्लीच्या नमन वैशने अॅमेझॉन फेस्टिवल सेलमध्ये शाओमीचा प्रसिद्ध स्मार्टफोन  खरेदी केला होता. परंतु, फोनच्या बदल्यात मोबाइलच्या डब्यात कपडे धोन्याचा रिन साबण मिळाला आहे.

दिल्लीच्या नमन वैशने १७ ऑक्टोबर रोजी अॅमेझॉन सेलमध्ये फोन रेडमी८ए ऑर्डर केला होता. सामान घरी पोहोचले. परंतू, डब्बा उघडला तर त्यांना धक्काच बसला. ७ हजार रुपयांचा फोन ऐवजी बॉक्समध्ये १४ रुपयांचा साबण होता. नमनने याचा फोटो ट्विट करीत सोशल मीडियावर अॅमेझॉनला टॅग केले आहे. तसेच म्हटले की, ग्राहकांचा असा विश्वास तोडू नका. अॅमेझॉनने तात्काळ याला रिप्लाय देत म्हटले की तपास करून नमनला ४ ते ५ दिवसात फोन दिला जाईल. या घटनेला सेलर जबाबदार आहे. या घटनेबद्दल आपल्या दुःख झाल्याचे अॅमेझॉनने म्हटले आहे.

अॅमेझॉन सेल असो की अन्य ई कॉमर्स कंपन्यांचा सेल मध्ये अनेकदा ग्राहकांना असा सामना करावा लागला आहे. भाव्या शर्मा नावाच्या एका ग्राहकाने यूट्यूब व्हिडिओवरून सांगितले होते की, फ्लिपकार्टवरून ८० हजार रुपयांचा आयफोन ११ प्रो ऑर्डर केला होता. परंतु, यावेळी ओरिजनल फोन ऐवजी क्लोन म्हणजे बनावट फोन पाठवला होता.

Protected Content