Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अहंकाराच्या खुर्चीतून उतरुन विचार करा : राहुल गांधींचे टीकास्त्र

नवी दिल्ली वृत्तसंस्था । शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठींबा देत काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला. जागे व्हा, अहंकाराच्या खुर्चीतून उतरुन विचार करा आणि शेतकर्‍यांना त्यांचा हक्क मिळवून द्या, असं राहुल यांनी म्हटलं आहे.

अन्नदाते रस्त्यांवर धरणे आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे टीव्हीवर खोटी भाषणं सुरू आहेत. शेतकर्‍यांच्या कष्टाचं आपल्या सर्वांवर कर्ज आहे. हे कर्ज त्यांना न्याय व हक्क दिल्यानंतरच फिटेल. त्यांना झिडकारुन, काठ्यांनी मारहाण करुन आणि त्यांच्यावर अश्रूधारांच्या नळकांड्या फोडून नाही. त्यामुळे जागे व्हा, अहंकाराच्या खुर्चीवरुन उतरुन विचार करा आणि शेतकर्‍यांचा अधिकार द्या, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

शेतकर्‍यांचं दिल्ली चलो आंदोलन अजूनही सुरुच आहे. आंदोलक शेतकर्‍यांना केंद्र सरकारच्यावतीने आज दुपारी तीन वाजता चर्चेसाठी बोलावण्यात आलं आहे. याआधी केंद्राने दिलेला शर्तीसह चर्चेचा प्रस्ताव शेतकर्‍यांना फेटाळून लावला होता. त्यानंतर आज कोणत्याही अटीविना चर्चेस तयार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. नवे कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी ठाम भूमिका शेतकर्‍यांनी घेतली आहे.

Exit mobile version