Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

असोदा येथील वाळू व्यावसायिक तरुणाला जिल्ह्यातून हद्दपार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाळू व्यवसाय करणाऱ्या तरूणाला एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्याचे आदेश जळगाव प्रांताधिकारी महेश सुधाळकर यांनी काढले आहे.

 

योगेश उर्फ ह्रतिक डिगंबर कोल्हे (वय ३०,रा.असोदा, ता.जळगाव) याच्याविरुध्द जळगाव तालुका व शनी पेठ पोलीस ठाण्यात 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचा प्रस्ताव तालुका पोलिसांनी पाठविला होता. प्रांताधिकाऱ्यांनी महेश सुधाळकर यांनी त्याला एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.

 

यासाठी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, हवालदार वासुदेव मराठे, माणिक सपकाळे व ज्ञानेश्वर कोळी यांनी त्याच्याविरुध्दची गुन्ह्याची माहिती संकलित करण्यासह प्रस्ताव तयार केला होता.

 

Exit mobile version