Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अशा ठेवणीतील शिव्या देऊ की यांना रात्रभर झोपा येणार नाही ; हसन मुश्रीफांचा पडळकरांना इशारा

कोल्हापूर (वृत्तसंस्था) मी या निमित्ताने इतकेच सांगेल की शिव्यांची मालिका आता सुरु झाली आहे. आता आम्ही अशा ठेवणीतील शिव्या देऊ की यांना रात्रभर झोपा येणार नाही. यांना रात्री जागून काढाव्या लागतील, असा इशारा राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांना दिला आहे.

 

हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली. यावेळी मुश्रीफ म्हणाले की, पडळकरांच्या वक्तव्यामागे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांचा हात आहे. बिनलायकीचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी देशाचे नेते शरद पवार यांच्याविषयी जी व्यक्तव्यं केली त्याचा मी निषेध करतो. या वक्तव्यांचे बोलवते धनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. हे सांगण्यासाठीच मी ही पत्रकार परिषद घेतली आहे. मी आता इतकंच सांगेल की शिव्यांची मालिका आता सुरू झाली आहे. आता आम्ही अशा ठेवणीतील शिव्या देऊ की पडळकरांना रात्रभर झोप येणार नाही. यांना रात्री जागून काढाव्या लागतील’, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला. या वक्तव्यांचे बोलवते धनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. हे सांगण्यासाठीच मी ही पत्रकार परिषद घेतली आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

Exit mobile version