अवैध वाळू व वृक्षतोड करुन लाकुड वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अवैधरित्या वाळू वाहतूकीसह बेकायदेशीर वृक्षतोड करून लाकडांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवार पोलीसांनी कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गौण खणिज (वाळु) व वृक्षतोड करुन वाहतुक होत असल्याची माहीती पोलीसांनी मिळाली. त्यानुसार पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पाहेकॉ नितीश पाटील, पोना विनोद भोई, पोकॉ संदीप पाटील, पोकॉ नरेंद्र चौधरी यांनी मंगळवारी १६ मे रोजी मध्यरात्री कारवाई करत मंडाई पेट्रोल पंपसमोर भडगांव रोडकडुन एक पांढऱ्या रंगाचे विना नंबरचे ढंबर चाळीसगाव शहराकडे येतांना दिसल्याने त्यात वाळुची चोरटी वाहतुक करणारे डंपरवर कारवाई केली. वाळूने भरलेले डंपर पोलीसांनी जप्त केला. याप्रकरणी चालक दिलीप शिवाजी गुंजाळ वय 32 वर्षे धंदा- ड्रायव्हर रा. धुळे रोड, पुंशी पेट्रोल पंपाच्या मागे, चाळीसगांव याच्या विरुध्द चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला. याचा पुढील तपास पोना/किशोर पाटील हे करीत आहेत. तसेच सकाळी 6 वाजेच्या सुमारास पातोंडा गावाकडुन येणारे एक लाल रंगाचे ट्रँक्टर क्रमांक (एम.एच.41 ए.ए.3105) मध्ये इसम नामे शेख ईब्राहीम गफुर मनीयार वय 27 वर्षे रा. वाघळी ता. चाळीसगांव हा विनापरवाना लाकडाचे ओंडके वाहतुक करतांना मिळुन आला. त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content