Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांसह वाळू साठ्यावर कारवाई

 

रावेर, प्रतिनिधी । तालुक्यात होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर तहसील प्रशासनाकडून नोव्हेंबर महिन्यात धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. यात ५०० ब्रासचा साठा जप्तीसह अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.

महसूल प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील महिन्यात दि. १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान तालुक्यात आठ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टॅक्टर-ट्राॅलीवर महसूलच्या पथकाने धडाकेबाज कारवाई केली आहे. यामध्ये रविंद्र कोळी, आसिफ तडवी, मिलिंद भंगाळे यांचे विना नंबर अवैध वाळूचे टॅक्टर-टॉली पकडले आहे. तर राजेंद्र कोळी यांचे एमएच ०८३५, रितेश धनगर एमएच १९ टी ४८०२, आत्माराम महाजन एम एच १९ पी ३८२१ यांच्यासह सात अवैध टॅक्टर-टॉली वर महसूल पथकाने कारवाई करून दंड वसूलीसाठी नोटीस पाठवण्यात येणार आहे. निंभोरासीम नजिक देखिल महसूल पथकाने अवैध वाळूचा ५०० ब्रास’चा साठा देखील जप्त केला आहे.

Exit mobile version