Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पलटी; कारवाईची मागणी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आर.आर. विद्यालयासमोर वाळून भरलेलेल्या ट्रक्टरच्या ट्रॉलीचे चाक निखळल्याने अपघात झाला. या सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. त्यामुळे काही काळ वाहतूकीची कोंडी झाली होती. वाळूच्या वाहतूकीला परवानगी नसतांना वाळू वाहतूक केली जात आहे. यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, स्टेटबँक ते नवीन बी.जे. मार्केट दरम्यानच्या आर.आर. विद्यालयात जवळ वाळूने भरलेला ट्रक्टर सकाळी ११ वाजेच्या सुमारास ट्रॉली सहीत जात होते. दरम्यान आर. आर. विद्यालयासमोर आलेल्या रस्त्याच्या मधोमध खड्ड्यात अचानक ट्रॉलीचे चाक गेल्याने पडलेल्या खड्डयामुळे ट्रॉलीच्या उजव्या बाजूच्या चाकाचे  ॲक्सल तुटला. त्यामुळे चाक निखळल्याने अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. दरम्यान हे वाळूचे ट्रॅक्टर कुणाचे आहे हे अद्याप कळू शकले नाही. त्याचप्रमाणे शहरात वाळूच्या वाहतूकीला पुर्णपणे बंद असतांना भरदिवसा अवैध वाळूची वाहतूक होत आहे हे या वरून दिसून येत आहे.  याकडे महसूल प्रशासन कारवाई करेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Exit mobile version