Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अवैध देशी दारू विक्री करणार्‍यावर गुन्हा दाखल

FIR

भुसावळ प्रतिनिधी । देशी दारूची अवैध विक्री करणार्‍या एका विरूध्द बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, आज दुपारी साडेतीनच्या सुमारास शहरात कृष्णा नगर समोर साई डेअरी जवळ एक इसम नामे प्रमोद प्रकाश धांडे त्याच्या कबज्यात गैर कायदा विना परवाना देशी व विदेशी दारुची विक्री करत असल्याची गुप्त बातमी मिळाली होती.

या अनुषंगाने पो.ना. निलेश बाविस्कर,रविंद्र बिर्‍हाडे,महेश चौधरी,रमन सुरळकर पो.कॉ.कृष्णा देशमुख,विकास सातदिवे,प्रशांत परदेशी यांनी लागलीच तेथे जावुन त्यास ताब्यात घेतले व त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव प्रमोद प्रकाश धांडे (वय – ३८ रा.कृष्णा नगर जामनेर रोड भुसावळ) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्या जवळ टँगो पंच कं.च्या ४८ बाटल्या मिळुन आल्या. यामुळे त्याच्या विरूध्द बाजारपेठ पोलीस स्थानकात प्रोव्हीशन गु.र.न.७६५/२०२० महाराष्ट्र दारु बंदी अधिनियम १९४९ क. ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पो.ना.निलेश बाविसकर करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर अधिक्षक भाग्यश्री नवटके, डीवायएसपी गजानन राठोड व बाजारपेठचे पोलीस निरिक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Exit mobile version