Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अवैध दारू विक्रेत्यांवर धाड; दोघांनी माल टाकून केले पलायन

यावल प्रतिनिधी । येथील बोरावल गेट परिसरात सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर देशी व विदेशी दारूची विक्री करताना दिसून आल्याने पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांनी मुद्देमाल सोडून घटनास्थळावरून पळ काढल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यावल शहरातील बोरावल गेट समोरील परिसरात दिनांक ९ जुलै रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुभारास संशयित आरोपी बंडू सुकलाल पाटील व गणेश शहाजी शिर्के हे दोन्ही जण मोटोरसायकलवर देशी व विदेशी कंपनी ची दारू अवैध पध्दतीत विक्री करत असताना आढळून आले. पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व सहाय्यक फौजदार नेताजी पंडित वंजारी यांनी आपल्या पोलिस कर्मचार्‍यांसह त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल सोडून गल्लीबोळातून पसार झाले.

या संदर्भात पोलीस कर्मचारी जगन्नाथ अशोक पाटील यांनी खबर दिल्याने यावल पोलीस स्टेशनला प्रोविशनल कलम ६५ इ प्रमाणे त्या दोघा फरार असलेली संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून मिळालेले अकराशे रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारू सह १५ हजार रुपये किमतीची मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.

Exit mobile version