Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे ट्रक्टर-ट्रॉली महसुल पथकाच्या ताब्यात

WhatsApp Image 2020 01 19 at 7.10.16 PM

रावेर, प्रतिनिधी | अवैधरित्या वाळू वाहतूक करणारी ट्रक्टर-ट्रॉली महसुल पथकाने आज पहाटेच्या सुमारास पकडली आहे. यामुळे अवैधरित्या वाळु वाहतुकदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, आज सकाळी पहाटेच्या सुमारास पातोंडी-खिरवळ रस्त्यावरुन अवैध वाळुची वाहतूक करीत असतांना विना नंबर असलेले ट्रक्टर-ट्रॉली आढळून आले. नायब तहसिलदार संजय तायडे यांच्या पथकाने ट्रक्टर-ट्रॉलीवर कारवाई केली. यापथकामध्ये मंडळ अधिकारी खानापूर पी.डी.आडे,सचिन पाटील,शरीफ तडवी, तलाठी रावेर दादाराव कांबळे, निलेश चौधरी, तलाठी खानापूर भरत वानखेडे, तलाठी पिंप्री यासिन तडवी, तलाठी केरहाले शैलेश झोटे,यांचा समावेश होता.

Exit mobile version