Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अवैधरित्या गुटखा, तंबाखुची वाहतूक करणाऱ्यास अटक; मुद्देमाल हस्तगत

पारोळा प्रतिनिधी । अवैधरित्या सुगंधित तंबाखु आणि विमल गुटख्याची वाहतूक करणाऱ्या तरूणाविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी त्याच्या ताब्यातील १ लाख ३२ हजाराचा माल आणि दीड लाखाची कार हस्तगत करण्यात आली आहे.

सपोनि रविंद्र बागुल, पोलीस नाईक विनोद साळी, पो.ना. सुनिल वानखेडे हे पारोळा शहरात पेट्रोलिंग करत असतांना मारूती स्वीप्ट कार क्रमांक (एमएच १९ एपी ०६२५) पारोळाहून अमळनेरकडे जात असतांना अमळनेर रोडवरील शिरसोदे गावाच्या पुलाजवळ पोलीसांनी तपासणी केली असता त्याना १२ हजार २०० रूपये किंमतीचे विमल पान मसाला ६०० पाकिटे आणि १९ हजार ८०० रूपये किंमतीचे सुगंधित तंबाखुचे ६०० पाकिटे असा एकुण १ लाख ३२ हजार रूपयांचा मुद्देमाल आण दीड लाख रूपये किंमतीची कार हस्तगत करण्यात आला. कार चालक संशयित आरोपी बबलु उर्फ करण रमश पाटील (वय-२८) रा. लालबाग परीसर पारोळा याला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी केली असता त्याने हा माल अमळनेरातील प्रकाश सिंधी यांच्याकडून २८ रोजी सायंकाळी ४ वाजता घेतला होता. बेकायदेशीर गुटखा व पान मसालाची वाहतूक केल्याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी करण पाटील याच्या विरोधात पारोळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version