Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अविवाहित पुरुषांना कोरोनामुळे मृत्यूचा अधिक धोका

 

स्टॉकहोम: वृत्तसंस्था । . स्वीडनमधील स्टॉकहोम विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार, अविवाहित पुरुषांची चिंता वाढवणारा दावा केला आहे. अल्प शिक्षण, अल्प उत्पन्न आणि अविवाहित असणाऱ्या पुरुषांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा अधिक धोका असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

संशोधक स्वेन ड्रेफेल यांनी सांगितले की, वेगवेगळ्या स्वतंत्र जोखीम घटकांच्या स्वतंत्र प्रभावांचे परिणाम आम्ही दाखवू शकतो. या जोखमींच्या घटकांबाबत याआधीदेखील चर्चा झालेली आहे. ‘नेचर कम्युनिकेशन’ संशोधनविषयक नियतकालिकेत हे संशोधन प्रकाशित झाले आहे. स्वेन ड्रेफेल यांनी सांगितले की, अत्यल्प शिक्षण, अल्प उत्पन्न या घटकांमुळे कोरोनाच्या आजारामुळे मृत्यू होण्याचा धोका आहे.

हा निकष इतर आजारांबाबतही लावता येऊ शकतो असेही त्यांनी सांगितले. अल्प शिक्षण आणि उत्पन्न असल्यामुळे अनेकजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अल्प उत्पन्न असल्यामुळे आरोग्यावर हा घटक कमी खर्च करतो. त्यामुळे त्यांना अधिक धोका असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोनामुळे महिलांपेक्षा पुरुषांना मृत्यूचा धोका अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले. महिला आणि पुरुषांच्या शरीराची रचना आणि जनुकीय संरचना वेगळी असल्याचा परिणाम यामध्ये दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. अविवाहित महिला आणि पुरुषांना कोरोनामुळे मृत्यू येण्याचा धोका दीडपट ते दोनपट अधिक आहे. एकटे आणि अविवाहीत असलेल्या व्यक्तींमध्ये आजारांचे प्रमाण अधिक असल्याचेही समोर आले होते. त्यामुळे या व्यक्तींमधील मृत्यू दर अधिक असतो.

हे संशोधन स्वीडिश ‘नॅशनल बोर्ड ऑफ हेल्थ अॅण्ड वेल्फेअर’कडे असलेल्या आकडेवारीच्या आधारे करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या २० वर्ष आणि त्यावरील वयोगटातील व्यक्तींच्या पार्श्वभूमीचा अभ्यास करण्यात आला.

Exit mobile version