Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अवाजवी कर आकारणी कमी करा – पृथ्वीराज सोनवणे यांची मागणी

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव शहर मुलभूत सुविधांपासून वंचित असतांना महापालिका प्रशासन   अवाजवी कर वाढीच्या नोटीस जळगावकरांना पाठवीत आहे. ही वाढीव कर आकारणी कमी करण्यात यावी अशी मागणी मीरा पृथ्वीराज सोनवणे व माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी महापौर जयश्री महाजन यांना निवेदनाद्वारे केली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, जळगाव शहरात मुलभूत सुविधांचा अभाव आहे. सर्वदूर खड्डेच खड्डे आहेत. सर्वत्र धूळ पसरली आहे. पाणीपुरवठा, साफसफाई नियमितपणे होत नाही. यासह इतर समस्यांनी जळगावकर त्रासलेले असतांना महापालिका प्रशासन अवाजवी कराची आकारणी करत आहे. तरी महापौर व सर्व नगरसेवकांनी सर्वानुमते ठराव करून वाढ ही १० ते १५ टक्क्यांपर्यंत करावी. सामान्यकर ५२.९२ टक्के तर वर्षातील ३६५ दिवसांपैकी केवळ ११० दिवस पाणीपुरवठा होत असतांना २००० रुपये वार्षिक पाणीपट्टी आकारण्यात येते. यासह पाणीपुरवठा लाभकराची वेगळी आकारणी करण्यात येते. नियमितपणे साफसफाई होत सर्वत्र घाण पसरलेली असल्याने साफसफाई करात वाढ करू नये. मलप्रवाह सुविधा कर हा मान्य नाही. जर आमची सेफ्टीक टँक भरली तर ती खाली करण्यासाठी वेगळा कर आकारून मनपा खाली करते म्हणून हा कर लावूच नये यासह इतर मागण्या केल्या आहेत. तसेच मनपाने ५० ते ९७.६७ टक्के पर्यंत कर वाढ केलेली आहे ती सुधारून १० ते १५ टक्के पर्यंत करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

 

Exit mobile version