अवघ्या ७ किलोमीटरसाठी घेतले ८ हजार रुपये भाडे ;हडपसरमधील ‘संजीवनी अ‍ॅम्बुलन्स’वर गुन्हा

पुणे (वृत्तसंस्था) बिबवेवाडी ते कर्वेनगर कोविड सेंटर या अवघ्या ७ किमी अंतरासाठी तब्बल ८ हजार रुपये भाडे आकारणाऱ्या हडपसरमधील ‘संजीवनी अ‍ॅम्बुलन्स’वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

बिबवेवाडी येथील सह्याद्री हॉस्पिटलवरुन दीनानाथ हॉस्पिटल या ७ किमी अंतरासाठी कोरोना बाधित रुग्णाला नेण्यासाठी संजीवनी अ‍ॅम्बुलन्सने ८ हजार रुपये वसुल केले. याशिवाय पीडिताकडे आणखी १ हजार १०० रुपयांची मागणी केली होती. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने त्यांना ८ हजार रुपये द्यावे लागले होते़. २५ जून रोजी हा प्रकार घडला होता. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर याबाबत संजीवनी अ‍ॅम्बुलन्सचे बिल टाकून त्यांच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली होती. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दिली होती. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या तक्रारीची दखल घेऊन अ‍ॅम्बुलन्सवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहन निरीक्षक धनंजय गोसावी यांनी बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. दरम्यान, आरटीओने ही अ‍ॅम्बुलन्स जप्त केली आहे़.

Protected Content