Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अवघ्या २२५ रुपयात मिळणार कोरोना लस ; पुणे सीरम इन्स्टिट्युटने जाहीर केली किंमत

पुणे (वृत्तसंस्था) लवकरच बाजारात येणारी कोरोना लसीची किंमत जास्तीत जास्त ३ यूएस डॉलर म्हणजे फक्त २२५ रुपये असेल,अशी माहिती पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटने दिली आहे.

 

सीरम इन्स्टिट्युट, GAVI ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन कोरोना लशीसाठी 150 मिलियन डॉलर्सचा निधी देणार आहे. GAVI मार्फत हा निधी सीरम इन्स्टिट्युटला कोरोना लशीच्या उत्पादनासाठी दिला जाईल. सीरम इन्स्टिट्युट २०२१ पर्यंत जवळपास १०० दशलक्ष डोस पुरवणार आहे. या लशीची किंमत जास्तीत जास्त 3 यूएस डॉलर म्हणजे फक्त २२५ रुपये असेल. यासाठी गेट्स फाऊंडेशन सीरम इन्स्टिट्युटने ही माहिती दिली आहे.

 

कोरोना लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि स्वस्तदेखील असावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे. फक्त भारताच नव्हे तर जगातील गरीब, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना परवडणारी अशी लस उपलब्ध करून देण्याचा भारताचा मानस आहे आणि त्या दिशेने आता पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने आणखी एक पाऊल उचलले आहे. सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषध निर्मिती करणारी कंपनी आहे. जगातली एक उत्तम संस्था असा या संस्थेचा लौकिक आहे. जगभरात सध्या करोनावरच्या अनेक लसींवर काम सुरु आहे. यापैकी काही लसी ह्युमन ट्रायलच्या टप्प्यात आहेत. सिरमनेही ऑक्सफर्ड आणि अमेरिकेच्या Novavax या कंपनीसोबत लसींसंदर्भातला करार केला आहे. यांच्या चाचण्या यशस्वी झाल्या आणि त्याला संमती मिळाली तर सिरम इन्स्टिट्युला लस उत्पादनासाठी निधी मिळणार आहे.

Exit mobile version