Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल-सूफ्फा इंटरनॅशनल स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा

पाचोरा, प्रतिनिधी ।   पाचोरा येथील अल – सूफ्फा  इंटरनॅशनल स्कूल अण्ड ज्युनिअर कॉलेज येथे साध्या पद्धतीने स्वातंत्रता दिवस साजरा करण्यात आला. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष अल्हाज रसूल शेठ व निवृत्त शिक्षक अमीन देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  यावेळी माजी नगरसेवक हाजी रसूल, रहीम बागवान, फिरोज खान, अॅड. वसीम बागवान, साजिद पठान, मुस्तकीम, जाकिर खाटिक, अमीन देशमुख यांनी आपले विचार मांडले व शिक्षणाचे महत्व पटवून दिले.  शाळेचे शिक्षक विजय बाविस्कर यांनी एकपात्री नाटक सादर केले व नाटकातून  पहिल्या लॉकडाऊनमध्ये दिहाडी मजदूर यांची दयनीय अवस्था मांडली. संस्थेचे अध्यक्ष अल्हाज मुस्लिम शेठ बागवान आणि संचालक इमाद मुस्लिम बागवान, हेडमास्टर खनसा, फरजाना खलील शेख, कलार्क शेख खालील अहेमद उपस्थित होते.

Exit mobile version