Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल-कायदाचा दुसऱ्या क्रमांकाचा दहशतवादी ठार

 

तेहरान : वृत्तसंस्था । इस्रायलने इराणमध्ये केलेल्या स्पेशल ऑपरेशनमध्ये अल-कायदाचा दुसऱ्या क्रमांकाचा दहशतवादी ठार झाला आहे.

१९९८ साली आफ्रिकेतील अमेरिकेच्या दोन दूतावासांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात त्याची भूमिका होती. इस्रायलने ऑगस्ट महिन्यात इराणमध्ये हे ऑपरेशन केले.

अब्दुल्लाह अहमद अब्दुल्लाह हा इराणमध्ये अबू मुहम्मद अल-मासरी नाव धारण करुन राहत होता. सात ऑगस्टला तेहरानच्या रस्त्यावर अब्दुल्लाह अहमदची बाईकवरुन आलेल्या दोघांनी गोळया झाडून हत्या केली. अबू मुहम्मद अल-मासरीकडे अल-कायदाचा सध्याचा म्होरक्या आयमन अल-झवाहीरीचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते.
इराणमध्ये आश्रयाला असलेला मासरी आणि अल-कायदाच्या अन्य दहशतवाद्यांवर अमेरिकन यंत्रणांची मागच्या अनेक वर्षांपासून नजर आहे. अल-कायदाने त्यांच्या नंबर दोन दहशतवाद्याची हत्या झाल्याचे जाहीर केले नाही.
अमेरिकन अधिकाऱ्याने अमेरिकेच्या सहभागाबद्दल काहीही सांगण्यास नकार दिला. स्थापनेपासून मासरी अल-कायदासोबत होता. .

Exit mobile version