Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पसंख्याक सेवा संघ तालुकाध्यक्षपदी शे.अक्रम यांची निवड

WhatsApp Image 2020 01 20 at 5.56.29 PM

बोदवड, प्रतिनिधी | येथे नुकतीचं अल्पसंख्यांक सेवा संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अल्पसंख्याक सेवा संघ तालुकाध्यक्षपदी शे.अक्रम तर सचिव म्हणुन अख्तर पिंजारी यांची निवड जाहीर करण्यात आली.

अल्पसंख्याक सेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जहांगीर ए.खान यांनी बोदवड तालुका कार्यकारिणी गठित करण्याच्या सुचना केल्या होत्या त्याअनुसार बोदवड तालुका अध्यक्षपदी शे.अक्रम शे.इब्राहीम यांची तर उपाध्यक्षपदी हाफीज हकीम यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारणी सदस्यांची निवड करण्यात आली. यात सचिवपदी अख्तर पिंजारी, सहसचिव इरशाद इस्ताक कुरेशी, संघटक शे. शहारुख शे. सलीम, सहसंघटक रमेश कडु चौधरी, प्रसिद्ध प्रमुख जुबेर पिंजारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. सदस्य म्हणून जयसिंग सोनवणे यांचा समावेश आहे.

Exit mobile version