Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पसंख्याक मंत्री ना. मलिक यांच्या इडी चौकशीचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केला निषेध (व्हिडिओ)

जळगाव,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज, प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री ना. नबाब मलीक यांची इडी या तपास यंत्रणेबाबत होत असलेल्या चौकशीचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जळगाव महानगर (जिल्हा) यांनी निषेध व्यक्त करत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले.

 

आघाडी सरकार हे मजबूत असून केंद्र ते पाडू शकत नसल्याने असल्या प्रकारचे प्रयोग केले जात असल्याचा आरोप माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केला. काळी फीत लावून याचा निषेध व्यक्त करण्यात आला.  निवेदनाचा आशय असा की, महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते भाजपा बद्दल व केंद्रातील सरकारच्या चुकीच्या व मनमानी कारभाराबाबत प्रसारमाध्यमात, जाहीर सभेत व बैठकीत सत्य मांडून केंद्रशासनाला जनमानसात उघडे पाडत असतात. या गोष्टींचा मनात राग धरुन केंद्र शासनाने ना.नबाब मलिक यांना आज रोजी इडी चौकशी बाबत समन्स पाठवून त्यांच्या कार्यालयात तडकाफडकी चौकशी व जबाब कामी बोलविण्यात आले आहे. वास्तविकः इकबाल कासकर व इतर गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या शक्ती सोबत कोणतेही संबंध नसतांना फक्त मुस्लीम असल्याने व केंद्रातील आणि महाराष्ट्र राज्यातील भाजपा नेत्यांना वेळोवेळी सडेतोडपणे जबाब देऊन देशात होत असलेल्या गैरकारभाराबाबत व या अगोदर केलेल्या भ्रष्टाचाराबाबत सत्य मांडत असल्याने त्यांना चौकशीच्या फेऱ्यात व न केलेल्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न करुन त्यांचे राजकीय व सामाजिक जिवन संपविण्याचा प्रयत्न केंद्रशासन व त्यांच्या बगलबच्चे असलेल्या इडी, सिबीआय, एन.आय.ए.व इतर तपास यंत्रणेमार्फत करीत आहे. तरी आज रोजी ना.नबाब मलिक यांची इडी मार्फत करण्यात येत असलेल्या चौकशीचा आम्ही या निवेदनाद्वारे निषेध करीत आहोत. केंद्र शासनाने आपला मनमानी कारभार थांबवावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पुढील काळात तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देतांना माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार मनीष जैन, एजाज मलिक, सुशील शिंदे, किरण राजपूत, रिजवान खाटीक, राहुल टोके, किरण चव्हाण, अजहर पठाण, रहीम तडवी, अकील पटेल, संजय जाधव, विशाल देशमुख, राजू मोरे, सुनिल माळी, रमेश बहारे, मोहसिन शेख, राजा मिर्झा, शंभू रोकडे, भगवान सोनवणे, अमोल कोल्हे, सलीम इनामदार, प्रसाद वानखेडे आदी उपस्थित होते.

 

Exit mobile version