Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पसंख्यांक शाळा, महाविद्यालांना अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांनी पायाभूत सुविधांकरिता अनुदानासाठी जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समितीकडे प्रस्ताव सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.

 

धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित खाजगी अल्पसंख्यांक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान देण्यात येते. या योजनेतंर्गत सन 2021-2022 मध्ये अनुदान प्राप्त करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील इच्छूक शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक विभागाच्या 18 फेब्रुवारी, 2022 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे.  यानुसार विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे सादर करावेत. सदर शासन निर्णय राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव, उच्चस्तरीय निवड समिती, प्रतापराव पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version