Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पसंख्यांक मंत्री मलिक यांच्या राजीनाम्याबाबत भाजपाचे निवेदन

जामनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी| अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील असा इशारा निवेदनाद्वारे केला आहे.

देशातील राष्ट्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालय यांनी दि.२३ रोजी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना १९९३ मुंबई बॉम्ब स्फोटातील सहभागी गुन्हेगारांशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणी अटक करुन मोठा गोप्यस्फोट केला आहे. हा अत्यंत गंभीर विषय आहे. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. हा राष्ट्राच्या अस्मितेचा विषय असुन भ्रष्टाचारी मंत्री नवाब मलिक हे जो पर्यंत मंत्री पदावर राहतील तो पर्यंत निष्पक्ष चौकशी होणार नाही. म्हणुन नवाब मलिक यांनी अल्पसंख्यांक मंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा. अन्यथा भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान ते राजीनामा देणार नसतील तर मा. मुख्यमंत्र्यांनी व मा.शरद पवार यांनी त्यांची मंत्रिमंडळातुन तातडीने हकालपटटी करावी.
तसेच वरील प्रकरणाची राष्ट्रीय तपासणी यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी. व राज्यात राष्ट्रपती राजवट लागु करावी. अन्यथा भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात यईल असा इशारा निवेनाद्वारे जामनेर नायब तहसिलदार यांना देण्यात आला.

यावेळी महविकास आघाडी व मंत्री नवाब मलिक यांच्या निषेार्थ घोषणा देण्यात आल्या निवेदनावर भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत रामधन बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र रमेश पाटील, शहर अध्यक्ष अतिष छगनराव झाल्टे, उपनराध्यक्ष प्रा.शरद मोतीराम पाटील, न पा गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, नगरसेवक महेंद्र कृपाराम बाविस्कर ,दत्तात्रय सोनवणे, उल्हास पाटील ,दिपक लक्ष्मण तायडे,आनंदा लाव्हरे ,सुहास पाटील ,कैलास नरवाडे ,बाबुराव हिवराळे,सुभाष पवार,श्रीराम वामन महाजन, डॉ.संजीव नामदेव पाटील,अजय प्रकाश पाटील, हेमंत शांताराम वाणी,मनोज आनंवा जंजाळ ,विलास कैलास ढाकरे ,तेजस संजय पाटील , विनायक देवराम चौधरी,बाळू चव्हाण ,संतोष बारी यांच्या सह पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version