Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या – वरणगाव शिवसेनेची मागणी

वरणगाव, प्रतिनिधी | यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने समजमन सुन्न झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज सोमवारी वरणगाव शहर शिवसेनेच्या वतीने पोलीस स्टेशनच्या बाहेर निदर्शने करून आरोपीला फाशी देण्यात यावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

 

यावल तालुक्यात २६ जानेवारी रोजी अल्पवयीन मुलीवर नराधमांनी अत्याचार केला. या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह राज्य हादरून जाऊन समाजमन सुन्न झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे सोमवारी पोलिस स्टेशनच्या बाहेर जोरदार निदर्शने करून आरोपीचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागणीसह सरकारी वकिल अॅड. उज्वलजी निकम यांनी हा खटल्याचे काम पाहावे अशी मागणीही शिवसेनेतर्फे दिलेल्या निवदनातून करण्यात आली आहे. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संघटक विलास मुळे, अल्पसंख्यांक नेते हिप्पी शेठ, शहरप्रमुख संतोष माळी, निलेश ठाकूर, अल्पसंख्याक संघटक सईद मुल्लाजी, उपशहर प्रमुख अशोक शर्मा, संघटक अरबाज खाटीक, सुफियान शेख, एजाज शेख, राहुल वंजारी, सागर वंजारी, योगेश कोळी, आकाश माळी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Exit mobile version