Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा करा; जळगाव तालुका काँग्रेसचे निवेदन

जळगाव प्रतिनिधी । मुंबईतील डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून कडक शासन व्हावे अशी मागणी आज २४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीच्या  वतीने तालुकाध्यक्ष मनोज चौधरी यांनी निवेदन दिले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबईतील डोंबिवली उपनगरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ३० जाणांनी सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीला आली आहे. पोक्सो बॉक्स कायद्याअंतर्गत या गुन्हेगारांना अटक करून कठोरातील कठोर कारवाई करून पीडित मुलीला न्याय द्यावा, या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर होण्याची संभावना असून पीडित मुलीला व तिच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण मिळावे आणि जलद गतीने न्यायालयात हा खटला चालवावा, अशी मागणी जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देवून  केले आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, प्रमोद घुगे, समाधान पाटील, भिकन सोनवणे, सोमनाथ माळी, सागर पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Exit mobile version