Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीला मारहाण करून विनयभंग

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील एका भागात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार १९ एप्रिल रेाजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील एका भागात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्याला आहे. गावात राहणारा समाधान संतोष जाधव याने १५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता तिचा पाठलाग केला. त्यानंतर माझ्याशी बोलण्या चालण्याचे संबंध ठेव असे सांगून तिचा हात पकडून विनयभंग केला. याला विरोध केल्यानंतर मुलीचे केस पकडून मारहाण केली. तसचे समाधान जाधवची आई इंदुबाई सतोष जाधव हिने देखील शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर बुधवारी १९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता पिडीत मुलीने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तिने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी समाधान संतोष जाधव आणि इंदूबाई संतोष जाधव या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहे.

Exit mobile version