Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फसून लावून अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी १५ जून रोजी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका खेडेगावात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवारी १४ जून रोजी सकाळी ११ वाता अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेत अपहरण केले. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही काहीही माहिती मिळाली नाही. अखेर पिडीत मुलीच्या आजीने गुरूवार १५ जून रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोले मोरे करीत आहे.

Exit mobile version