Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला काही तरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरुवार २५ मे रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घरात सर्वजण झोपलेले असताना अल्पवयीन मुलगी हिला गावात राहणारा गजानन एकनाथ इंदरकर याने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळून नेले. दरम्यान तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु ती कुठेही मिळून आली नाही. गावातील गजानन इंदुरकर यानेच अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याची तक्रार पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी गजानन एकनाथ इंदुरकर यांच्या विरोधात गुरुवारी २५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार शशिकांत पाटील करीत आहे.

Exit mobile version