अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नांद्रा गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी सोमवारी ८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात  नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नांद्रा गावात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी ८ मे रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याचे समोर आले. पिडीत मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी तिचा नातेवाईक व मैत्रिणींकडे शोध घेतला परंतू कुठेही काहीही माहिती मिळाली नाही. सायंकाळी साडेसहा वाजता पिडीत मुलीचा भाऊ याने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.

Protected Content