Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील एका गावातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी ११ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशीकी, जळगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १० एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवत तिला फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू मुलगी कुठेही मिळून आली नाही. अखेर मंगळवारी ११ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता नातेवाईकांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.

Exit mobile version