Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीसात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने काल दुपारी २ वाजताच्या सुमारास घरच्यांना दुकानातून कुल्फी घेऊन येते असे सांगून गेले. मात्र ती आजपावेतो घरी परतले नाही. त्यावर घरच्यांनी तिला परिसरासह नातेवाईकांकडे शोधाशोध केली असता सदर मुलगी मिळून आली नाही. म्हणून कोणीतरी अज्ञाताने तिला फूस लावून पळविले अशी खात्री होताच वडीलांनी चाळीसगाव शहर पोलीस स्थानक गाठून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version