Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी २२ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १० फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असतांना बबलू दरबार भिल रा. चिऱ्यामुड्या ता. चैनपूर जि. खरगोन मध्यप्रदेश याने फूस लावून पळवून नेल्याचे उघडकीला आले. पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू ती कुठेही मिळून आली नाही. अखेर बुधवारी २२ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुपारी २ वाजता संशयित आरोपी बबलू दरबार भिल याच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहे.

Exit mobile version