Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कानळदा परिसरात राहणारी १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेण्याची घटना घडली आहे. याबाबत बुधवार १८ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील कानळदा रोड परिसरातील एका भागात १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी १७ जानेवारी रोजी रात्री १० वाजता अल्पवयीन मुलगी घरी असतांना एका अज्ञात व्यक्तीने दिला फूस लावून पळवून नेले. हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु ती कुठेही मिळून न आल्याने अखेर बुधवारी १८ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहे.

Exit mobile version