Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील देवराम नगरातील एका भागात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फसून लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी १९ नोव्हेंबररोजी रात्री ९ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील देवराम नगरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान अल्पवयीन मुलगी घरी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेले. नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू मुलगी कुठेही आढळून आली नाही. अखेर शनिवारी १९ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता मुलीच्या नातेवाईकांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहे.

Exit mobile version