Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील विटनेर शिवारातील १४ वर्षीय वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवार, १४ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव तालुक्यातील विटनेर शिवारातील एका भागात अल्पवयीन मुलगी कुटुंबासह वास्तव्यास आहे. २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घराबाहेर पडलेली मुलगी, घरी परतली नाही. तब्बल महिनाभरापासून तिचा सर्व शोध सुरु होता. मात्र अल्पवयीन मुलीचा कुठेही शोध लागला नाही, अथवा ती मिळून आली नाही. अखेर महिनाभरानंतर अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी शनिवारी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे तक्रारीत नमूद असून यावरुन अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल मोरे हे करीत आहेत.

Exit mobile version