अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरूणाला कारावासाची शिक्षा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोरोना लॉकडाऊन काळात अल्पवयीन मुलगी ही आपल्या भावासोबत आकोला येथे जळगाव येथून जात असतांना एकाने दुचाकीवर बसवून पळवून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने २  वर्ष १० महिन्याची कारावासाची शिक्षा मंगळवारी १४ मार्च रोजी दुपारी २ वाजता सुनावली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, १९ मे २०२० रोजी कोरोना काळात लॉकडाऊन लावण्यात आले होते. त्यावेळी पिडीत अल्पवयीन मुलगी ही आपल्या भावासोबत मुंबईहून आकोला येथे जळगावमार्गे पायी जात होती. शहरातील कालिंका माता मंदीर परिसरात जेवण वाटप सुरू असतांना पिडीत मुलीने व तिच्या भावाने जेवण करून एका झाडाखाली बसली होती. त्यावेळी आरोपी गणेश सखाराम बांगर (वय-३२) रा. मालेगाव जि.वाशीम हा दुचाकी घेवून आला. मी पण आकोला येथे जात असल्याचे सांगून दोघांना दुचाकीवर बसविले. त्यानंतर पोलीस असल्याचे सांगून तिच्या भावाला खाली उतरवून पिडीत मुलीला दुचाकीवर बसवून पळवून नेले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आली होती. जळगाव व जिल्हा न्यायालयाचे न्यायमुर्ती डी.वाय. काळे यांच्या न्यायालयात खटला चालविण्यात आला. या एकुण ९ साक्षिदार तपासण्यात आला. यात पिडीत मुलगी, तिचा भाऊ आणि तपासाधिकारी गजानन राठोड यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने दोषी ठरवत आरोपी गणेश बांगर याला १ वर्ष १० महिन्याची साधी कारावासाची शिक्षा आणि ५०० रूपयांचा दंड ठोठावला आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. प्रदीप महाजन यांनी कामकाज पाहिले.

Protected Content