Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीचे अपहरण

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील खडकी गावातील एका अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवत अपहरण केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात मंगळवार १० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील खडकी गावातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मुलगी घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेली. मुलीच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता परंतू कुठेही मिळून आली नाही. अखेर मंगळवारी १० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मुकुंद पाटील करीत आहे.

Exit mobile version