Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीचा विवाह ; बालविकास प्रकल्य अधिकारी यांची तक्रार , पोलीसात गुन्हा दाखल

 

यावल : प्रतिनिधी । येथील बोरावल गेट परिसरात अल्पवयीन मुलीचे लग्न लावणाऱ्या काझीसह इतरांविरूद्ध बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

शहरातील बोरावल गेट परिसरात राहणारे राजु पटेल ( रा – कंडारी ता – धरणगाव) व विवाह लावणारे हाजी समद पटेल ( रा – बोरावल गेट) शाहरूख पटेल व अन्य आरोपींनी एका अल्पवयीन मुलीचा विवाह (निकाह ) मुस्लीम धार्मीक रितीरिवाजा प्रमाणे लावुन दिल्याचे उघडकीस आले होते जिल्हा बालसंरक्षण सचिव तथा जिल्हा महीला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांच्या कार्यालयास मिळालेल्या पत्रासोबत जोडलेल्या पत्रांचे अवलोकन त्यांनी केले होते अल्पवयीन मुलीचे वय१५ वर्ष ३ महीने असल्याचे स्पष्ट झाल्यावर तिचा जबाब चोपडा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अजीत सावळे यांनी नोंदवून घेतला होता शाहरूख पटेल यांचाही जबाब नोंदविन्यात आला होता

त्यानंतर या आरोपींविरुद्ध बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६चे पोट कलम १ व ३ अन्वये यावलच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी यावल पोलीसात तक्रार दाखल दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील , संजय तायडे हे करीत आहे .

Exit mobile version