अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल ; तरुणाला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात पाणी पिण्याच्या बहनाने घरात एकट्या असलेल्या 16 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवार २० मे रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

 

जळगाव तालुक्यातील एका गावात शेतात पीडित अल्पवयीन मुलगी ही कुटुंबासह वास्तव्यास आहे. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असताना नरेंद्र सोनवणे नावाचा तरुण मुलीच्या घरी आला. त्याने पीडित मुलीला पाणी मागण्याचा बहाना केला. यादरम्यान मुलगी ही पाणी देत असताना, तरुणाने तिचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. आई वडील घरी आल्यानंतर मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने दुसऱ्या दिवशी शनिवारी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली.  या तक्रारीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.

Protected Content