Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला पाच वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला जळगाव जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता सुनावली आहे. शेख असिफ शेख नबी (वय-२४) रा. शिवाजीनगर परिसर, जळगाव असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही ११ सप्टेंबर २०१८ रोजी घरी पायी जात असताना शेख असिफ शेख नबी याने तिचा हात पकडून विनयभंग केला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा खटला विशेष पोक्सो न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात चालवण्यात आला. सरकार पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिच्या बहिणींची साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्या अंति न्यायमुर्ती बी.एस. महाजन यांनी शेख असिफ शेख नबी याला दोषी ठरवून भारतीय दंड विधान कलम ३५४ अ आणि बाललैंगिक अत्याचार अधिनियमाच्या कलमानुसार दोषी ठरविण्यात आले. या अनुषंगाने आरोपी शेख असिफ शेख नबी (वय-२४) रा. शिवाजीनगर परिसर, जळगाव याला दोन्ही कलमांच्या अंतर्गत ५ वर्षे सश्रम कारावास आणि ।५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. चारुलता बोरसे यांनी प्रभावी युक्तिवाद केला होता. या कामी पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले.

Exit mobile version