Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे करत तिच्या विनयभंग केल्याची घटना ५ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ५ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास या परिसरात राहणारा संशयित आरोपी फरहान शब्बीर शेख याने पीडित मुलीचा हात पकडून तिच्याशी जबरदस्ती करत अश्लिल चाळे लागला. त्यानंतर तिला दमदाटी करत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. दरम्यान हा प्रकार पीडित मुलीने नातेवाईकांना सांगितला. त्यानुसार नातेवाईकांनी बुधवारी १० एप्रिल रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी फरहान शब्बीर शेख यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे हे करीत आहे.

Exit mobile version