Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अर्थसंकल्पीय अधिवेशनात खडसे, मेहतांवरील अहवाल बाहेर येण्याची शक्यता

eknath khadse

 

मुंबई (वृत्तसंस्था) राज्य विधिमंडळाचे २४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात एकनाथ खडसेंच्या झोटिंग कमिटीचा आणि प्रकाश मेहतांविरोधातला लोकायुक्तांचाही अहवाल सरकार मांडण्याची शक्यता आहे. दरम्यान, ज्यांनी चुकीचे केले असेल, त्यांची चौकशी होणारच, अशा सूचक शब्दात स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात याबाबत वक्तव्य केले होते.

 

महाविकासआघाडी सरकारविरोधात प्रस्ताव आणण्याची भाजप तयारी करत होते. परंतू एकनाथराव खडसे यांच्या भोसरी एमआयडीसी प्रकरणी झोटिंग समितीचा आणि प्रकाश मेहतांविरोधातला लोकायुक्तांचा अहवाल महाविकासआघाडीने हे दोन्ही अहवाल आणण्याची जोरदार तयारी केली असल्याचे कळते. थोडक्यात भाजपला रोखण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून सुरु आहे. फडणवीस सरकारने दडवलेले चौकशी अहवाल विधानसभेच्या पटलावर आणणार का?, याची प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन प्रचंड वादळी ठरण्याची शक्यता आहे.

Exit mobile version