अरे व्वा…आज पुन्हा जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या शून्य !

जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा एकदा शून्यावर आल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केलेल्या रिपोर्टमधून समोर आली आहे.

 

आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने एका रिपोर्टच्या माध्यमातून कोरोनाचे अपडेट दिले आहेत. यात गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात एकही नवीन कोरोना रूग्ण आढळून आले नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात सुध्दा एका दिवशी एकही रूग्ण आढळून आला नव्हता. यानंतर गेल्या चोवीस तासांमध्ये सुध्दा एकही रूग्ण आढळून आला नसल्याची बाब लक्षणीय आहे.

 

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात गत चोवीस तासांमध्ये तीन रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात आता कोरोनाच्या लसीकरणाला देखील वेग आल्याचे दिसून येत आहे.

Protected Content