Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अरे बापरे…मधमाशांच्या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू तर मुलगा जखमी

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रोजंदारी करून घरी परतत असतांना दुपारी चारच्या सुमारास येथील इसमाचा अचानक मधमाशांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शिंदोळ रस्त्यावर घडली असुन या दुर्दैवी घटनेमुळे नगरदेवळा परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सैय्यद सबदर सैयद इस्माईल व त्यांचा मुलगा आबिद सैय्यद सबदर हे दोघे ३१ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास रोजंदारी चे काम करून परतत असतांना शिंदोळ गावाजवळ आगी मोहळच्या मधमाशांच्या अचानक झालेल्या हल्ल्यात सैयद सबदर सैयद इस्माईल (वय – ५८) यांच्या तोंडाला मधमाशा चावल्याने त्यांचा मृत्यू झाला तर मुलगा आबीद सैयद सबदर यालाही माशांनी चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. सैय्यद इस्माईल हे मजुरी करून आपला आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होता. मयत सैय्यद इस्माईल यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा मोठा परिवार असून त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शासनाकडून त्यांच्या परिवारास आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version