Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अरे बापरे..! जिल्ह्यात आज ५४८ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह; २४५ झाले बरे

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालात जिल्ह्यात ५४८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर आजच २४५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज जळगाव शहर आणि बोदवड तालुक्यात प्रत्येक एक असे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आज जळगाव शहर, भुसावळ, चोपडा, जामनेर आणि चाळीसगाव तालुक्यात पुन्हा संसर्गाने जोर धरला आहे.

आजची आकडेवारी

जळगाव शहर- २४८, जळगाव ग्रामीण- ६, भुसावळ-४६, अमळनेर-२, चोपडा-८३, पाचोरा-१, भडगाव-०, धरणगाव-८, यावल-०, एरंडोल-३, जामनेर-४५, रावेर-२४, पारोळा-१७, चाळीसगाव-४५, मुक्ताईनगर-१८, बोदवड-० आणि इतर जिल्हे २ असे एकुण ५४८ रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालानुसार ६२ हजार ६५० रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५७ हजार ६४९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्यात आज जळगाव शहरातील ८२ वर्षीय आणि बोदवड तालुक्यातील ५१ वर्षीय पुरूषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजवर १ हजार ३९६ रूग्णांचा मृत्यू झालाय. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स अधिकारी डॉ. एन.एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. 

Exit mobile version