Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अरे बापरे… जिल्ह्यात आज नव्याने ३६८ कोरोना रूग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यातून ३६८ बाधित रूग्ण आढळले आहे. तर १०१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात जळगाव शहरासह चाळीसगाव आणि भुसावळ संसर्ग वाढलेला दिसून येत आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर-१६४, जळगाव ग्रामीण-३४, भुसावळ-२३, अमळनेर-५, चोपडा-२८, पाचोरा-२, भडगाव-२, धरणगाव-२, यावल-०, एरंडोल-६, जामनेर-४, रावेर-७, पारोळा-७, चाळीसगाव-५५, मुक्ताईनगर-२३, बोदवड-३ आणि इतर जिल्हे -३ असे एकुण ३६८ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण ५९ हजार २२२ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५६ हजार २७९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १ हजार ५६६ रूग्ण विविध कोवीड सेंटरला उपचार घेत आहे. आज भुसावळ आणि चोपडा तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झालाआहे. अशी महिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांनी दिली आहे.

Exit mobile version